मुखवटा
मुखवटा आजकाल बरेच दिसतात लोक मुखवटा घालून वावरणारे खरेपणाला आत दाबून उगाच खोटेपणा मिरवणारे त्या मुखवट्याआड कोणीतरी वेगळाच उभा असतो त्या व्यक्तीचा खरा चेहरा आपल्याला क्वचितच कधीतरी दिसतो सोंग घेण्यासाठी कसलंही तो मुखवटाच कामाला येतो बाहेरचं जग आतल्या पासून सहजपणे वेगळं करतो कधीकधी माणसं म्हणे ह्या मुखवट्यामुळे तुटतात खरं-खोट्याच्या जाळ्यात अडकून गैरसमजांना तोंड देतात वादातून मग समोर येतो चेहरा मुखवट्या मागचा एका क्षणात उडवून जातो विश्वास एकमेकांवरचा दिशा ठोसर