Mask वालं प्रेम
Mask वालं प्रेम अचानक एका संध्याकाळी ते एकमेकांसमोर आले एवढ्या दिवसांनंतर आज परत ओळखीचे झाले आतुरलेल्या नजरेने तो तिच्याकडे बघत राहिला ह्या lockdown मधला दुरावा त्याने तिच्या डोळ्यांत पाहिला थोडे जवळ येताच लोकांनी Social distancing ची आठवण केली मग पुढे आलेली ती दोन पावले मागे गेली Shake hand सोडून नमस्काराचं त्यांनीही कर्तव्य बजावलं आता बाहेर फिरता येणार नाही त्याने नजरेतून तिला समजावलं बोलता बोलताच पर्स मधून तिनी sanitizer ची बाटली काढली त्या दोघांमध्ये common अशी ती एकमेव गोष्ट ठरली त्यांच्या भेटींचा आणि बोलण्याचा असा बदलला होता गेम गच्चीवरचं बदलून आता ते ठरलं mask वालं प्रेम दिशा ठोसर