Posts

Showing posts from May, 2020

भातुकली

भातुकली खरंतर मी अगदी लहान असतानाच शिकले सारं काही करायला भातुकलीची खेळणी ख-या भांड्यांसारखी वापरायला छोट्याशा त्या कपमधून मी बाबांना चहा द्यायचे त्या कपातला तो अदृश्य चहा बाबा एका घोटात प्यायचे छोट्याशा त्या lighter ने खोटा-खोटाच गॅस पेटवायचे तवा ठेवून छोटा त्यावर एक छोटीच पोळी भाजायचे गंमत म्हणून त्या किसणीवर माझे crayons किसून बघायचे पण crayons लवकर संपले म्हणून आईचा ओरडा सुध्दा खायचे त्या भातुकलीच्या खेळात मी म्हणेन ते सगळं चालायचं मी वाढलेल्या खोट्या जेवणाचं मात्र खरं-खरं कौतुक व्हायचं मी मोठी होत जाताना ती भातुकली बाजूला राहिली माझ्यात दडलेली पाककला तिनेच तर सगळ्यात आधी पाहिली दिशा ठोसर