मीच मला सांगते
मीच मला सांगते
हल्ली ना कधी कधी मी
स्वतःशीच बोलू लागते
माझ्या मनातलं सर्व काही
मीच मला सांगते
सुखाचे क्षण आठवून
त्यांना मनसोक्त रंगवते
दुःखांकडे दुर्लक्ष करायलाही
मीच मला शिकवते
आरशा समोर उभं राहून
मी स्वतः कडेच बघते
नजरेतून माझ्या नकळत
मी बरंच काही बोलते
मी बोललेलं तिला कळेल
असे मला आपले वाटते
म्हणूनच की काय माहित नाही
पण ती गालातल्या गालात हसते
मग मला सुद्धा माझ्या बरोबर
कोणीतरी आहे हे कळते
म्हणूनच माझी best friend कोण हे विचारल्यावर
मी माझंच नाव घेते
दिशा ठोसर
हल्ली ना कधी कधी मी
स्वतःशीच बोलू लागते
माझ्या मनातलं सर्व काही
मीच मला सांगते
सुखाचे क्षण आठवून
त्यांना मनसोक्त रंगवते
दुःखांकडे दुर्लक्ष करायलाही
मीच मला शिकवते
आरशा समोर उभं राहून
मी स्वतः कडेच बघते
नजरेतून माझ्या नकळत
मी बरंच काही बोलते
मी बोललेलं तिला कळेल
असे मला आपले वाटते
म्हणूनच की काय माहित नाही
पण ती गालातल्या गालात हसते
मग मला सुद्धा माझ्या बरोबर
कोणीतरी आहे हे कळते
म्हणूनच माझी best friend कोण हे विचारल्यावर
मी माझंच नाव घेते
दिशा ठोसर
Comments