भातुकली

भातुकली

खरंतर मी अगदी लहान असतानाच
शिकले सारं काही करायला
भातुकलीची खेळणी
ख-या भांड्यांसारखी वापरायला

छोट्याशा त्या कपमधून
मी बाबांना चहा द्यायचे
त्या कपातला तो अदृश्य चहा
बाबा एका घोटात प्यायचे

छोट्याशा त्या lighter ने
खोटा-खोटाच गॅस पेटवायचे
तवा ठेवून छोटा त्यावर
एक छोटीच पोळी भाजायचे

गंमत म्हणून त्या किसणीवर
माझे crayons किसून बघायचे
पण crayons लवकर संपले
म्हणून आईचा ओरडा सुध्दा खायचे

त्या भातुकलीच्या खेळात
मी म्हणेन ते सगळं चालायचं
मी वाढलेल्या खोट्या जेवणाचं मात्र
खरं-खरं कौतुक व्हायचं

मी मोठी होत जाताना
ती भातुकली बाजूला राहिली
माझ्यात दडलेली पाककला
तिनेच तर सगळ्यात आधी पाहिली

दिशा ठोसर 

Comments

Charu said…
खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता!! मला सुधा आठवली ती भातुकली आणि त्या आठवणी!! सहज,सोपे शब्द गुंफून किती सुंदर अर्थ आहे!
सुप्रिया कुलकर्णी said…
आतिशय सुंदर भावना व्यक्त केल्या आहेस.या
बालपणीच्या आठवणी कायम जपून ठेव.अनेक शुभेच्छा.

Unknown said…
किती छान दिशा. माला आठवतंय तुम्ही खेळताना:)
Unknown said…
दिशा
खूप छान पद्धतीने मांडणी केली आहेस
तू भातुकलीत बाबांना चहा देत आहेस,तुझे बाबा पटकन चहा पिट आहेत हे सर्व अगदी डोळ्या समोर आले
Keep it up.
Bhavana said…
तुझी "भातुकली" वाचताना बालपण आठवले.
Unknown said…
अगदी खरं आहे

Popular posts from this blog

Peaceful Himachal

Wonderwall

Me As I See Myself