मळभ
मळभ
ढगांची शाल पांघरत आकाश
काळं काळं दिसतं
पाऊस येण्याआधी सगळं
मळभ होऊन जातं
अंधार पसरून सर्वत्र
तो सूर्याला देखील लपवतो
सूर्य लपून गेल्याने मग
अचानक गारवा जाणवतो
हे मळभ वातावरण खरं
एक कमालीची जादू करतं
प्रत्येक माणसाला स्वतःमध्येच
एकदा डोकावून बघायला लावतं
स्वतःकडे लक्ष देताच
तो माणूस विचार करतो
वास्तवात नक्की मळभ काय
हा प्रश्न त्याला पडतो
चंचल त्याचं मन त्याला
आभाळासम वाटतं
भावनांना आत दाबून जे
थोड्या स्वार्थाकडे वळतं
मग मधूनच कधीतरी त्या भावनांना
पाझर मोठा फुटतो
निसर्ग फक्त ह्या पाझराला
पश्चात्ताप म्हणतो
दिशा ठोसर
ढगांची शाल पांघरत आकाश
काळं काळं दिसतं
पाऊस येण्याआधी सगळं
मळभ होऊन जातं
अंधार पसरून सर्वत्र
तो सूर्याला देखील लपवतो
सूर्य लपून गेल्याने मग
अचानक गारवा जाणवतो
हे मळभ वातावरण खरं
एक कमालीची जादू करतं
प्रत्येक माणसाला स्वतःमध्येच
एकदा डोकावून बघायला लावतं
स्वतःकडे लक्ष देताच
तो माणूस विचार करतो
वास्तवात नक्की मळभ काय
हा प्रश्न त्याला पडतो
चंचल त्याचं मन त्याला
आभाळासम वाटतं
भावनांना आत दाबून जे
थोड्या स्वार्थाकडे वळतं
मग मधूनच कधीतरी त्या भावनांना
पाझर मोठा फुटतो
निसर्ग फक्त ह्या पाझराला
पश्चात्ताप म्हणतो
दिशा ठोसर
Comments