Mask वालं प्रेम

 Mask वालं प्रेम

अचानक एका संध्याकाळी
ते एकमेकांसमोर आले
एवढ्या दिवसांनंतर आज
परत ओळखीचे झाले

आतुरलेल्या नजरेने तो
तिच्याकडे बघत राहिला
ह्या lockdown मधला दुरावा
त्याने तिच्या डोळ्यांत पाहिला

थोडे जवळ येताच लोकांनी
Social distancing ची आठवण केली
मग पुढे आलेली ती
दोन पावले मागे गेली

Shake hand सोडून नमस्काराचं
त्यांनीही कर्तव्य बजावलं
आता बाहेर फिरता येणार नाही
त्याने नजरेतून तिला समजावलं

बोलता बोलताच पर्स मधून
तिनी sanitizer ची बाटली काढली
त्या दोघांमध्ये common
अशी ती एकमेव गोष्ट ठरली

त्यांच्या भेटींचा आणि बोलण्याचा
असा बदलला होता गेम
गच्चीवरचं बदलून आता
ते ठरलं mask वालं प्रेम

दिशा ठोसर 

Comments

Unknown said…
Wow mast @Disha
Charu said…
Wow! Great! Heart touching and apt to the current situation!
Bhavana said…
Safe distance love
😀 😀 😀
Unknown said…
Very nice Disha. Keep it up and keep post ung more of ur poems.
Unknown said…
very nice dear. keep it up 😘😘
Supriya Prani said…
Nice Disha. Keep it coming.

Popular posts from this blog

Peaceful Himachal

Wonderwall

Me As I See Myself